पालघर-पालघर लोकसभा पोटनिवडणूकीचे राजकीय वातावरण तापले आहे. दोन दिवसानंतर मतदान आहे. तत्पूर्वी प्रचाराला जोर आले आहे. आज भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारसभेसाठी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी आल्या होत्या. सकाळी डहाणू येथे त्यांनी प्रचारसभा घेतली. मात्र या सभेकडे नागरिकांनी पाठ फिरविल्याचे दिसून आले. सभेसाठी जवळपास १० हजार नागरिकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली होती मात्र अपेक्षित जनसमुदाय प्रचार सभेला आले नाही. दरम्यान आज संध्याकाळी शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्यासाठी उद्धव ठाकरे प्रचारसभा घेणार आहे.