स्मॉल वंडर प्री प्रायमरी शाळेत रक्षाबंधन

0

नवापुर । येथील शांतीनगर भागातील स्मॉल वंडर प्री प्रायमरी शाळेत रक्षाबंधन व कलर विक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या वर्षा पासुन सुरु झालेल्या या प्रायमरीत हिरवळ वातावरणात चिमुकल्यांसोबत रंगारंगी कार्यक्रमात संपन्न झाला. हा आठवडा कलर विक म्हणुन साजरा करण्यात आला.

मुलांना प्रत्यक्ष रंगाची ओळख व्हावी म्हणुन मुलांना पुर्ण आठवडाभर वेगवेगळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यात आले. अभ्यासाबरोबरच व्यक्तिमत्व विकास व सामाजिक विकास घडावा याउद्देशाने या नाविण्य पुर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचा प्रिसिंपल अर्चना विराज शाह,व्हाईस प्रिसिंपल रिना पाटील,कश्मीरा मॅडम, सुरभी पाथारकर मॅडम यांनी मुलांकडुन चांगल्या पध्दतीने कार्यक्रम करुन घेतले.