नवी दिल्ली । जगातील सर्वात पहिल्या ‘व्हॅक्युम क्लीनर’चा शोध लावून स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे ब्रिटिश इंजिनीअर हबर्ट सेसिस बूथ यांची बुधवारी 147 वी जयंती. या महान संशोधकाला गुगलने आज खास ‘डुडल’ साकारून अभिवादन केलं आहे. जमिनीवरील धूळ, माती क्षणार्धात शोषून घेणार्या व्हॅक्युम क्लीनरने साफसफाईचे अवघड काम अत्यंत सोपे करून टाकले. जवळपास प्रत्येक घर आणि कार्यालयात आज या यंत्राने महत्त्वाची जागा पटकावलीय. बूथ यांच्या दूरदृष्टीचे हे प्रतीक आहे.