जळगाव । पंतप्रधान यांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत अभियानातंर्गत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उपक्रमात वैयक्तिक पातळीवर व्यवस्थापन परिषद सदस्यांनी सक्रीय सहभाग घेणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार 20 जून रोजी व्यवस्थापन परिषदेची बौठक झाली. या बौठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात येवून मान्यता देण्यात आली. कुलगुरु प्रा.पाटील यांनी या बौठकीत विद्यापीठाकडून स्वच्छता अभियानातंर्गत सुरु असलेल्या उपक्रमाव्यतिरिक्त सदस्यांनी वौयक्तिक पातळीवर देखील योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवून या अभियानात आपल्या परीने सक्रीय सहभाग देणार असल्याचे सांगितले व तसा अहवाल हे सदस्य लवकरच कुलगुरुंना सादर करणार आहेत.
विविध सदस्यांचा झाला सत्कार
आजच्या बौठकीत विद्यापीठाने निकाल मुदतीच्या आत लावल्याबद्दल कुलगुरु, प्र-कुलगुरु, उत्तरपत्रिका तपासणारे सर्व प्राध्यापक व परीक्षा विभागातील अधिकारी – कर्मचारी यांचे सदस्यांनी अभिनंदन केले. प्राचार्य एल.पी.देशमुख यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावाला प्रा.एस.टी.इंगळे यांनी अनुमोदन दिले. बौठकीत विद्या परिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर निवडून आलेल्या प्रा.जे.बी.नाईक व प्रा.प्रिती अग्रवाल यांचे कुलगुरुंच्या हस्ते स्वागत करण्यात आले. प्रा.नितीन बारी यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. दीपक पाटील यांनी अनुमोदन दिले. विद्यापीठ परिसरात कर्मचाज्यांनी श्रमदानातून चार्या खोदण्याचे काम व वृक्षारोपण केल्याबद्दल त्यांच्यांही अभिनंदनाचा ठराव मंजूर झाला. आव्हान 2018 चान्सलर ब्रिगेड आपत्तकालीन व्यवस्थापन प्रशिक्षण शिबीरात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या डॉ.पंचशिला वाघमारे (मुक्ताईनगर ) व प्रा.हेमंत जोशी (धुळे) यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट संघव्यवस्थापक म्हणून पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचेही यावेळी अभिनंदन करण्यात आले. बैठकीस स्वच्छता अभिरानांतर्गत केल्या जाणाऱ्या उपक्रमाच्या निरोजनाबद्दल चर्चा करतांना सक्रिर सहभागाचा संकल्प करण्यात आला.