पिंपरी-चिंचवड । महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त ’क’ क्षेत्रिय कार्यालय परिसरात स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत ’क’ क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात सुमारे 19.3 टन कचरा उचलण्यात आला. प्रभाग क्रमांक आठ इंद्रायणीनगर, जयगणेश साम्राज्य परिसरात राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात नगरसेवक विलास मडेगिरी, विक्रांत लांडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आर. एम. बेद, बी. आर. कांबळे, विजय दवाळे, वैभव कांचनगौडा यांनी सहभाग घेतला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुमारे 295 अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवी संस्थांनी सहभाग नोंदविला.