स्वच्छता अभियान

0

भोर । उपसभापती लहूनाना शेलार यांच्या पुढाकाराने भोर तालुका पंचायत समितीच्या नसरापूर गणात रविवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

माळेगाव, नसरापूर, चेलाडी, कापूरहोळमार्गे भाटघर धरण जलाशय भागातील माळवाडी ते वाकांबे या भागात त्यांनी मित्रांसमवेत सायकल रॅली काढून स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती केली. या रॅलीतून सायकल चालवा आणि पर्यावरण वाचवा’असा संदेश देण्यात आला. तसेच वाकांबे गावात स्वच्छता करण्यात आली. या सायकल रॅलीत शेलार यांच्या समवेत किरण गोरे, शिवराम मांढरे, सुनील वाळुंज, बाळासाहेब कचरे, गणेश सणस, नारायण पांगारकर, गोविंद मांढरे, अमोल मोरे, रोहन झेंडे, करण जाधव, गणेश काळे, अमोल हजारे, किशोर कचरे आदींसह तरुण मोठ्या संख्येने सामिल झाले होते.