स्वच्छता कर्मचार्‍यास शिवीगाळ : एकास अटक

0

भुसावळ- स्वच्छता कर्मचार्‍यास शिविगाळ करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गोपाळ हेमनदास कमनानी (भुसावळ) यास अटक करण्या आली. 2 रोजी सकाळी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी तरुण राम ढिक्याव (वाल्मिक नगर, भुसावळ) हे स्वच्छता करीत असताना कमनानी यांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा आणला.
उपअधीक्षक गजानन राठोड, प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक बालक बार्‍हे, समाधान पाटील, तुषार पाटील, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींनी आरोपीला अट केली. तपास उपनिरीक्षक सारीका कोळपकर करीत आहेत.