स्वच्छता निरीक्षकांना नगरसेवकांकडून दमदाटी

0

यावल । शहर पालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना नगरसेवक सुधाकर धनगर यांनी शुक्रवारी शिविगाळ केल्याप्रकरणी कर्मचार्‍यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला होता मात्र नगरसेवक व कर्मचारी यांच्यात नगराध्यक्षांसह इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करीत वाद समोपचाराने मिटवण्यात आला. मात्र, शुक्रवारी घडलेल्या या प्रकारामुळे सकाळच्या सत्रात पालिकेचे वातावरण चांगलेच तापले होते.

लोकप्रतिनिधींच्या यशस्वी शिष्टाईने वादावर पडदा
मुख्याधिकारी यांच्याकडे पालिका मजूर संघाने केलेल्या तक्रारीनुसार शहरातील प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक सुधाकर धनगर यांनी आपल्या प्रभागात फवारणी व जंतूनाशक पावडर टाकण्याबाबत पालिकेचे स्वच्छता निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांना शुक्रवारी सकाळी मोबाईलवर सुचना केल्या मात्र त्या प्रभागात आपण त्या प्रभागात जंतूनाशक पावडर व फवारणी केल्याचे सांगितलेे मात्र यावर नगरसेवक सुधाकर धनगर भडकले व त्यांनी गायकवाड यांच्याशी अरेरावी ने बोेलत शिवीगाळ केली. तेव्हा या प्रकाराचा निषेध पालिका मजूर संघाच्या वतीने करण्यात आला व पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार शनिवारपासून काम बंदचा इशारा देण्यात आला होता मात्र, नगराध्यक्षा सुरेखा कोळी, नगरसेवक अतुल पाटील, दीपक बेहेडे व इतर सहकारी नगरसेवकांनी कर्मचारी व नगरसेवक धनगर यांच्यात समोपचार घडवुन आणत प्रकरण मिटवले.