स्वच्छता मोहिमेत दोंडाईचेकर उतरले रस्त्यावर

0

दोंडाईचा । सन 2017 हे वर्ष स्वच्छता वर्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांनी जाहिर केल्यानंतर रविवारी वर्षाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण 12 प्रभागात स्वच्छता त्या – त्या प्रभागातील नगरसेवक ,नगरसेविका, सामाजिक संघटना, विविध शाळा, महाविदयालयातील विदयार्थी, राजकिय पक्ष व नागरीकांनी स्वयस्फुर्तीने सहभाग नोंदवत नववर्षानिमीत्ताने दोंडाईचा शहर चकाचक केले. नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांचा हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण शहरातील नागरीक रस्त्यावर उतरले व स्वच्छ दोंडाईचाचा एकसाथ सहभाग नोंदवला. दरम्यान, सकाळी प्रभाग 7 मध्ये सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते स्वच्छता रथाचे उद्घाटन करण्यात आले. एकुणच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी स्वच्छता मिशन हाती घेवून नववर्षाची चांगली सुरवात पालिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा नयनकुंवरताई रावल यांच्या स्तुत्य उपक्रमाचे संपूर्ण दोंडाईचा शहरातून कौतुक करण्यात येत आहे, वर्षभर चालणार्‍या मोहिमेत प्रत्येक नागरीकाने सहभाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्षा सौ.रावल यांनी केले आहे.

स्वच्छता मोहीमसाठी यांनी नोंदवला सहभाग
प्रभाग 1 मध्ये नगरसेवक सुफीयान तडवी, गिता दोधेजा यांच्यासोबत जायन्टस ग्रुप ऑफ सहेली, अब्दुल हमीद मित्र मंडळ, राष्ट्रहीत शिक्षण संस्था, जयगंगा चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. प्रभाग 2 मध्ये नगरसेवक रवि उपाध्ये, अफरिन बागवान यांच्या सोबत आर.डी.एम.पी.हायस्कुल, जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविदयालय, अण्णासाहेब मेमोरियल ट्रस्ट, प्रभाग 3 मध्ये उपनगराध्यक्ष नबु पिंजारी आणि नगरसेविका कल्पना नगराळेंसोबत आर.डी.एम.पी. ज्यु.कॉलेज, विकासरत्न सरकारसाहेब रावल कृषी महाविदयालय, गरीब नवाज वेल्फेयर संस्था यांनी सहभाग घेत स्वच्छता मोहित यशस्वीपणे राबविली. प्रभाग 4 मध्ये सभागृह नेता रणविरसिंह देशमुख, सईदा पिंजारी यांच्या सोबत पंचवटी मित्र मंडळ, जियान मल्टीपर्पज फाउंडेशन, खान्देश मराठी पत्रकार संघ, एम.सी.व्ही.सी. कॉलेज, प्रभाग 5 मध्ये नगरसेविका जुई देशमुख व मनिषा भिल यांच्या सोबत इनरव्हील क्लब, जायन्टस ग्रुप, दोंडाईचा मराठी पत्रकार संघ, आनंद सखाराम सांस्कृतिक मंडळ, गर्ल्स हायस्कुल, डॉ.नानासाहेब पी.व्ही.सोहोनी ट्रस्ट, भावसार समाज मंडळ, प्रभाग 6 मध्ये वैशाली महाजन व निखीलकुमार जाधव यांच्या सोबत रोटरी क्लब, आम्ही दोंडाईचेकर, आखिल मराठी पत्रकार संघ, जैन युवा सोशल ग्रुप, स्वाध्याय परीवार, रोटरी स्कुल, अहिंसा इंटरनॅशनल स्कुल, नर्सिग कॉलेज, आदी संस्थांनी सहभाग घेतला. प्रभाग 7 मध्ये चिरंजीवी चौधरी व मनिषा गिरासे यांच्यासोबत लायन्स क्लब दोंडाईचा, जायन्टस ग्रुप, हस्ती स्कुल, तर प्रभाग 8 मध्ये नगरसेवक नरेंद्र सोनवणे, व भावना महाले यांच्यासोबत ज्ञानोपासक शिक्षण मंडळ, जनजागृत शिक्षण संस्था, परीवर्तन शिक्षण संस्था आदींनी सहभाग घेतला.

शहरातील संस्थांचा सहभाग
नगरसेवक नरेंद्र कोळी व मनिषा नरेंद्र गिरासे यांच्यासोबत सनराईजर्स रोटरी क्लब, जेष्ठ नागरीक संघ, रामदेवजी बाबा ट्रस्ट, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल, तर प्रभाग 10 मध्ये प्रतोद संजय मराठे व सुरेखा तावडे यांच्यासोबत डी.आर.हायस्कुल, आर्ट ऑफ लिव्हींग, दादासाहेब रावल कला व विज्ञान महाविदयालय आदी संस्थांनी सहभाग नोंदविला. प्रभाग 11 मध्ये नगरसेवक प्रदिप कागणे व मंगला धनगर यांच्यासोबत खाजगी प्राथमिक विदयालय, स्वो.वि.संस्था महाविदयालय, तर प्रभाग 12 मध्ये नगरसेवक सांगर मराठे व प्रियंका ठाकूर यांच्यासोबत निरंकारी मंडळ, रूहाणी संत्संग मंडळ, जनसहयोग प्रतिष्ठान या संस्थांनी सहभाग नोंदविला. याशिवाय कृषी उत्पन्न बाजार समिती, दुध संघ, खरेदी विक्री संघ, अशा विविध संस्थाच्या कर्मचार्‍यांनी देखील स्वच्छता मोहिम राबवून आपला परीसर स्वच्छ केला.