स्वच्छता समिती पथकाची न्हावी येथे भेट

0

यावल- तालुक्यातील न्हावी येथील ग्रामपंचायतीस स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता समिती पथकाने भेट दिली. या भेटीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गाव हगणदारी मुक्त करण्याबाबत पाहणी करण्यात आली. पथकात चिराई बहुद्देशीय संस्था धुळ्यचे सचिव मनोहर प्रताप पाटील, तालुका समन्वयक स्वप्निल आदिवाल, तालुका समन्वयक अमित तडवी यांचा सत्कार पंचायत समिती सदस्य सरफराज तडवी, ग्रामपंचायत सदस्य सतीश जंगले, जावेद तडवी यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायतीचे हगणदारी मुक्तीचे कार्य पाहून समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले व काही सूचना दिल्या. त्या सूचनांचे पालन करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन सरपंच भारती चौधरी यांनी प्रसंगी दिले. यावेळी उपसरपंच सुनील भोगे, ग्रामपंचायत सदस्या योगीता तळेले, मनिषा सुरवाडे, मीना चौधरी, सोनल महाजन, आलिशान तडवी, यशवंत तळेले, नदीम मिस्तरी उपस्थित होते. आभार ग्रामपंचायत सदस्य सतीश जंगले यांनी मानले.