पिंपरी-चिंचवड : ‘स्वच्छता ही सेवा’ या मोहिमेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरातील आठ क्षेत्रिय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सुमारे 60 टन कचरा जमा केला आहे. ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी हिरीरीने मोहिमेत सहभाग नोंदवून परिसराची स्वच्छता केली.
मोहिमेत यांचा सहभाग
’अ’ प्रभागातील विवेकनगर, आकुर्डी येथे झालेल्या अभियानामध्ये नगरसेवक प्रमोद कुटे, जावेद शेख सहभागी झाले होते. म्हाडा कॉलनी, मोरवाडी येथे नगरसेविका अनुराधा गोरखे, क्षेत्रिय अधिकारी आशादेवी दुर्गुडे, एम. एम. शिंदे, ’ब’ प्रभागात नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, मोरेश्वर भोंडवे, क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, बी. के. दरवडे सहभागी झाले होते. ’क’ प्रभागात प्रभाग क्रमांक दोन जाधववाडी, सेक्टर 16 परिसरातील मोहिमेत प्रभाग अध्यक्षा अश्विनी जाधव, नगरसेवक राहुल जाधव, क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, बी. बी. कांबळे, आर. एम. भोसले, आर. एम. बेद, अंकुश झिटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे व संस्कार प्रतिष्ठानचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
भोसरी परिसरातही साफसफाई
तसेच प्रभाग क्रमांक सहामधील पुणे-नाशिक मार्गावर भोसरी येथे झालेल्या स्वच्छता अभियानात नगरसेवक राजेंद्र लांडगे, वैभव कांचनगौडा तर इंद्रायणीनगर येथे क्षेत्रिय अधिकारी अण्णा बोदडे, बी. बी. कांबळे, आर. एम. भोसले, आर. एम. बेद, विजय दवाळे सहभागी झाले होते. ’ड’ प्रभागात झालेल्या मोहिमेमध्ये क्षेत्रिय अधिकारी सीताराम बहुरे, व्ही. के. बेंडाळे सहभागी झाले होते. ’इ’ प्रभागात मोशी, आदर्शनगर व भोसरी मयुरी पॅलेस परिसरात झालेल्या मोहिमेत नगरसेविका हिराबाई घुले, क्षेत्रिय अधिकारी चंद्रकांत इंदलकर, सहाय्यक आरोग्यधिकारी पी. बी. तावरे तसेच ’फ’ प्रभागात झालेल्या स्वच्छता मोहिमेत सह आयुक्त दिलीप गावडे, मनोज लोणकर, ’ग’ प्रभागात नगरसेविका अर्चना बारणे, श्रीनिवास दांगट, ’ह’ प्रभागात प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेविका माधवी राजापुरे, सीमा चौगुले, राजेंद्र राजापुरे, क्षेत्रिय अधिकारी आशा राऊत, विनोद बेंडाळे सहभागी झाले होते.