डीआरएम आर.के.यादव यांनी केला उपक्रमाचा गौरव
भुसावळ :- सेंट्रल रेल्वे सिनीयर सेकंडरी (इमि) स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रेल्वे स्टेशनवरील भिंतींवर स्वच्छतेचा संदेश देत चित्ररूपाने भिंत रंगवली. आकर्षकरित्या काढण्यात आलेल्या चित्रांनी प्रवोशांचे लक्ष वेधले. रेखाटलेल्या चित्रांचे अनावरण डीआरएम आर.के.यादव यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. या प्रसंगी वरीष्ठ कार्मिक अधिकारी डॉ.तुशाबा शिंदे हे उपस्थित होते.
सॅनेटरी नॅपकीन मशीनचे उद्घाटन
विद्यालयात 21 परमवीर चक्र प्रदान झालेल्या सैनिकांची आठवण म्हणून त्यांचे फोटो व माहिती भिंतीवर चितारण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळून देशभक्ती जागृत होण्यास मदत होणार आहे तसेच विद्यालयात सॅनेटरी नॅपकिन व्हेंडींग मशिन लावण्यात आल्याने महिला व विद्यार्थिनींसाठी सुविधा उपलब्ध झाली. या मशिनचे उद्घाटन महिला समाज सेवा समिती अध्यक्षा चित्रा यादव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी डीआरएम आर.के.यादव, सिनी.डीपीओ डॉ.तुशाबा शिंदे, महिला समाज सेवा समिती उपाध्यक्षा रजनी सिन्हा आणि कार्यकारिणी सदस्या उपस्थित होत्या.