स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे; शून्य कचरा व्यवस्थापनाचा रहिवाशांचा निर्धार

0

डोंबिवली | स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात तळागाळापासूनच सुरू केली तर त्याला एका मागोमाग एक असे व्यापक स्वरुप येऊ शकेल, या विचारातून नक्षत्र अनुराधा सोसायटीतील रहिवाशांनी शून्य कचरा व्यवस्थापनाचा निर्धार केला असून त्या अनुषंगाने रहिवाशांनी जागरूकता मोहीम तसेच कचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू केले आहे.

ही संकल्पना एप्रिल 2017 मध्ये स्थापन झालेल्या या सोसायटीचे प्रवर्तक मोहित भोईर यांनी 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात मांडली होती. त्याचे रहिवाशांनी स्वागत केले आहे. त्यांच्या या संकल्पनेला सर्वांनीच पाठिंबा दिला आहे. कचरा व्यवस्थापन शून्य गारबेज प्रकल्प राबवून केले जाईल व त्याचे खत झाडांसाठी वापरण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक ते सहाय्य देण्याचेही मोहित  भोईर यांनी ठरविले आहे.

या व्यवस्थापनासाठी सोसायटीचे अध्यक्ष मानगुटकर, सचिव शांताराम शिंदे, खजिनदार जोशी यांनी सहकार्य दिले असून अन्य सदस्यांना घेऊन हे कार्य चालविले आहे.