शिरपूर । शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.11 च्या नगरसेविका मोनिका रोहित शेटे यांनी मुख्याधिकार्यांकडे शहराच्या कचर्याच्या विल्हेवाटी संदर्भात व स्वच्छते संदर्भात निवेदन दिले. निवेदनात शहरातील वेगवेगळ्या भागात उधडा कचरा पडलेला असतो सदर कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी ओला व सुका कचर्यासाठी स्वतंत्र कचरापेट्यांची व्यवस्था करावी तसेच कचरा पेट्यांची संख्या वाढविण्यात यावी अशीही मागणी केलेली आहे. तसेच नगर पालिकेने नगरपरिषद हद्दीतील तमाम घरांत व दुकानांमध्ये लहान कचरा पेट्यांचे वाटप करावे अशीही विनंती करण्यात आली आहे. पावसाळा हा वृक्षलागवडीसाठी पोषक असतो.त्यामुळे पावसाळ्यात न.पा.ने मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करावे तसेच शहरातील ज्येष्ठ नागरिक व अबालवृध्दांसाठी आसनव्यवस्थेची (बॅचेस) व्यवस्था करावी ही देखील मागणी करण्यात आली. निवेदन भाजप जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, गटनेते मोहन पाटील यांच्या मार्गदर्शनात देण्यात आले. निवेदनात शहराध्यक्ष/नगरसेवक हेमंत पाटील, राजेंद्र गिरासे, चंदन राजपूत, सुलोचना साळुंखे, किरण दलाल, दिपक माळी आदि नगरसेवकांच्या तसेच आबा धाकड,विलास सोनार,भाऊ शिरसाठ, रोहित शेटे आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.