रहिवाशांनी स्वयंस्फूर्तीने तोडले गटारीवरील ढापे व ओटे
भुसावळ– शहर स्वच्छतेसाठी पालिकेने पुढाकार घेतला असतानाच शहरातील वाल्मीक नगरातील रहिवाशांनी स्वयंस्फूर्ती आपल्या दारापुढील गटारीवर टाकलेले ढापे, ओटे तोडून रस्ते मोकळे केले. विशेष म्हणजे पालिकेने कोणतीही नोटीस बजावली नसताना या प्रभागाच्या नगरसेविका सोनी संतोष बारसे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत रहिवाशांनी अतिक्रमण काढल्याने शहरात समाधान व्यक्त होत आहे.