स्वच्छ अ‍ॅप डाऊनलोड करण्यात उल्हासनगर ठरले आहे अव्वल

0

स्वच्छ सिटी रॅँकिंगमध्ये 55 वा क्रमांक

उल्हासनगर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत लोकसंख्येच्या प्रमाणे दिलेले लक्ष्य पूर्ण करण्यात उल्हासनगर महापालिका प्रशासनाला यश आले आहे. यामुळे मागील वर्षी स्वच्छ सिटी रँकिंग मध्ये 410 क्रमांकावर असलेले उल्हासनगर 55 व्या क्रमांकावर आले आहे.

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत केंद्र शासनामार्फत स्वच्छतेच्या अनुषंगाने स्वच्छ सर्वेक्षण 2019 मोहिम संपूर्ण देशात सूरू आहे. शहरातील स्वच्छता संदर्भात शासनाने स्वच्छता अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपद्वारे स्वच्छता विषयक नागरिक तक्रारी पाठवू शकणार आहेत. उल्हासनगर शहराच्या लोकसंख्येप्रमाणे किमान 25000 अ‍ॅप नागरीकांकडून डाऊनलोड करण्याचे लक्ष शासनाकडून देण्यात आले होते. त्यानुसार उल्हासनगर शहराचा गुण क्रमांक 3875 पैकी 410 वा क्रमांक माहे ऑक्टोबर 2018 मध्ये होता. नव्याने पदभार स्वीकारलेले पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2019 बाबत आढावा घेवुन उपायुक्त विकास चव्हाण, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार व सर्व स्वच्छता निरीक्षक यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले होते. सर्वाना जास्तीत जास्त स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याबाबत व प्राप्त तक्रारींचे निराकरण करून घेण्याचे निर्देश दिले.

त्यानुसार आरो1/2य विभागातील कर्मचारी सर्व महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि बेरोजगार विदयार्थी व महिला बचत गट यांच्याकडून एकुण 28,872 अ‍ॅप नागरीकांकडून डाऊनलोड करून घेण्यात आले आहेत. स्वच्छता अ‍ॅपवर प्राप्त तक्रारींचे त्वरीत निराकरण करण्यात येत असल्याने त्यानुसार उल्हासनगर शहराचा गुण क्रमांक संपूर्ण देशात 55 क्रमांकावर आलेला आहे. आयुक्त अच्युत हांगे यांनी स्वच्छ सर्वेक्षण 2019 मध्ये उल्हासनगर शहराचा क्रमांक पहिल्या 50 च्या आत येण्यासाठी सर्व नागरीकांनी, खाजगी व सामाजीक संस्थांनी, व व्यापारी संघटनांनीजास्तीत जास्त स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करून स्वच्छते संबंधित तक्रारी अ‍ॅपद्वारे नोंदवाव्यात असे जाहिर आवाहन पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी केले आहे.