ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीने नगरपरिषदेच्या कार्यासाठी पुरविले मनुष्यबळ
आळंदी चकाचक अभियानाला गती
आळंदी : आळंदी नगरपरिषदेने स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 मध्ये घेतलेल्या सहभागाला अधिक बळ देण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीने नगरपरिषदेच्या कार्यास मनुष्यबळ देत शहराच्या स्वच्छतेस हातभार लावण्यास सुरुवात केली. या देवस्थांच्या निर्णयाचे नगरपरिषदेने स्वागत केले आहे. स्वच्छ तीर्थक्षेत्र आळंदीला संयुक्तिक स्वच्छता मोहीम सुरु झाल्याने चकाचक आळंदी अभियानाला यामुळे गती मिळणार आहे. या निर्णयात आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड.विकास ढगे पाटील यांनी विशेष लक्ष घातले. त्यांचे नियंत्रणात झालेल्या संस्थानच्या मासिक सभेत याबाबत सर्वानुमते स्वच्छतेच्या या निर्णयास मान्यता देण्यात आली. अॅड. ढगे यांनी याबाबत विशेष लक्ष घालून ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली आहे. या निर्णयाचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर,नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर,नगरसेवक सागर भोसले आदींनी स्वागत केले आहे.
हे देखील वाचा
शहरात स्वच्छता करण्यास सुरूवात
आळंदीत स्वच्छतेच्या कामास नगरपरिषदेने सुरु केलेल्या अभियानात देवस्थानाने मनुष्यबळ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे आळंदीत देवस्थानच्या माध्यमातून कामगारांनी शहर परिसरात स्वच्छता करण्यास सुरुवात केली. यामुळे आळंदीचे स्वच्छतेत वाढ होऊ लागली आहे. या संदर्भात व्यवस्थापक माऊली वीर म्हणाले की, स्वच्छतेसाठी मंदिर परिसराला प्राधान्य देण्यात येत आहे. मंदिर चहुबाजूने स्वच्छता केली जात आहे. या बरोबर नगरपरिषद चौक ते महाद्वार, महाद्वार ते भराव रस्ता आणि इंद्रायणी किनारा एका बाजूने स्वच्छता केली जाणार असल्याचे वीर यांनी सांगितले. आळंदी नगरपरिषद स्वच्छ सर्व्हेक्षण 2019 काम करीत आहे. या त्यांच्या कार्यास अधिक गती मिळावी यासाठी परिषदेने संकल्प केला आहे. यासाठी देवस्थानचे पाठबळ अधिक निर्णायक ठरणार आहे. माउली मंदिर भागात यामुळे स्वच्छता वाढली आहे.
रुग्णालयास सुविधा देण्याची मागणी
आळंदी ग्रामीण रुग्णालयास विविध आरोग्य विषयक यंत्रणा सुविधा राज्य शासनाने देण्याची मागणी पुणे जिल्हा परिषद सदस्यां दीपाली काळे यांनी केली आहे. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचा वापर कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिक, भाविक करीत असल्याने या रुग्णालयास जिल्हा परिषद सदस्यां दीपाली काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब ठाकूर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक जी.जी.जाधव यांचेशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाचे जागेत वाहनांसह खाजगी बेकायदेशीर पार्किंग, भाजी विक्रेत्यांची गर्दी, जनरेटरचा अभाव, औषध भांडार व एक्सप्रेस फिडर सुविधेची गैरसोय, शवविच्छेदन कक्ष आदींची अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयाचे विविध मागण्यांसाठी काळे यांनी माजी मुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देऊन गैरसोय दूर करण्यासाठी मागणी केली आहे. आळंदीत ग्रामीण रुग्णालयास भाविक व नागरिक तसेच कुरुळी मरकळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या आरोग्याचे सेवेसाठी रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे.