पनवेल । सिडकोच्या अखत्यारीतील सर्व सुविधा महापालिकेकडे हस्तांतरीत झाल्यानंतर स्वच्छ भारत अभियानातर्गत स्वच्छता सर्वेक्षणांतर्गत महापालिकेच्या हद्दीतील सर्व परिसर स्वच्छ केला जावा, अशी आग्रही मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल येथे चर्चासत्रात केली. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 2018 मध्ये होणार्या सर्वेक्षणाची पूर्वतयारी तसेच घनकचरा व्यवस्थापन कसे करावे याचे प्रशिक्षण बुधवारी आयोजित केले होते. स्वच्छता सर्वेक्षणात युद्ध पातळीवर उतरून महापलिकेला प्रथम क्रमांक मिळवा यासाठी नागरिकांना योगदान द्यावे, असे आवाहन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी या वेळी केले. सिडकोने केले जाहीर सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या अंतिम यादीप्रमाणे पॅकेजमध्ये नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांनुसार पुनर्वसन केले जाणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रामध्ये नव्याने बांधकाम केल्यास अथवा सद्यस्थितीतील बांधकामात वाढीव बांधकाम केल्यास अशा नागरीकांना सूचित करण्यात येत आहे की त्यांना कोणत्याही प्रकारचे पॅकेज अथवा सुविधा देण्यात येणार नाहीत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ क्षेत्रात कोणतेही नवीन अथवा वाढीव बांधकाम करू नये असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे.
पनवेल महापालिकेच्या हद्दीतील बराचसा भाग हा सिडको वसाहतीत मोडतो. त्या वसाहतींमध्ये मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यात सिडको नेहमीच अपयशी ठरलेला आहे. त्यासाठी सिडकोच्या अखत्यारीतील सुविधा महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याची आमची आग्रहाची मागणी आहे. त्यानंतर सर्व महानगराचे सर्वेक्षण केले जावे.
– परेश ठाकूर, सभागृह नेते
घन कचरा व्यवस्थापनात सर्वांनी योगदान द्यायचे. त्यातूनच पनवेल महापालिकेला स्वच्छ आणि कचरामुक्त करायची आहे.
– डॉ.कविता चौतमोल, महापौर