पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व इसीएकडून घेण्यात आलेल्या शालेय स्वच्छ भारत अभियानात आयोजित निबंध, चित्रकला स्पर्धेचे प्रशस्तीपत्रक वाटप न्यू एंजल स्कूल तळवडे येथे करण्यात आले. शहरातील ७५०० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
यावेळी इसीएचे संस्थापक विकास पाटील, पुरुषोत्तम पिंपळे, राहुल श्रीवास्तव, शाळेच्या संस्थापिका सायली भानसे, सुगंधा भानसे, प्रा.वासंती हेगडे, वैशाली गव्हानेम, मनीषा घोबले आदींची यावेळी उपस्थिती होती. शाळा आवारात इसीए व पिंपरी चिंचवड महापालिका उद्यान विभागाच्या सहकार्याने लावलेल्या झाडांची पाहणी करण्यात आली. शाळेचा स्वच्छ भारत निबंध स्पर्धेत पिंपरी-चिंचवड शहरात दुसरा क्रमांक आला आहे. त्याबद्दल त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.