‘स्वच्छ भारत’ अंतर्गत सुलभ शौचालयाचे उद्घाटन

0

परभणी । महापालिकेच्यावतीने स्वच्छ भारत अभियानांतर्गत सुलभ शौचालयाचे चार ठिकाणी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त राहूल रेखावार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर, उपमहापौर सय्यद समी, स्थायी समितीचे सभापती गणेश देशमुख, सभागृहनेते भगवान वाघमारे, उपायुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह अनेक नगरसेवक, सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान, प्रसिद्धी विभागप्रमुख राजकुमार जाधव तसेच मनपाचे सर्व अधिकारी, अभियंता यांची उपस्थिती होती. शनिवार बाजार येथील सुलभ शौचालयाचे लोकार्पण करण्यात आले असून या सुलभ शौचालयाचा बाहेरगावाहून  येणाऱ्या शेतकर्यांना व व्यापार्यांना लाभ होणार आहे.

नागरीकांची गैरसोय दूर होणार
शौचालयात स्नानाचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्रामिण भागातून येणार्‍या जाणार्‍या नागरीकांची गैरसोय होत होती. महिलांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच शहरातील नेहरू नगर, उड्डाण पुलाजवळील गोरक्षणच्या जागेत, राहतनगर येथे सुलभ शौचालयाचे उद्घाटन करण्यात आले. एक महिला व एक पुरुष यांची या ठिकाणी नियुक्ती केली असून पाण्याची, लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांनी वैयक्तिक शौचालय बांधावे. सर्वांनी शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे. आपले शहर निरोगी राहील याची दक्षता सर्वांनी घ्यावी असे आवाहन आयुक्त राहूल रेखावार यांनी केले.