जळगाव । स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती शहरात दाखल झाली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात समितीच्या सदस्यांनी स्वच्छते संदर्भातील कागदपत्रांची पडताळणीचे काम सकाळ पासुन सुरु आहे. या समितीत केंद्रीय विभागाकडून अधिकारी निखील पाटील, राहूल पाटील आले आहेत. दोन दिवसांत कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. या सर्व कागदपत्रांचे फोटो काढून दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयातील सर्व्हेरवर अपलोड करण्यात येणार आहे. दोन दिवस कागदपत्रांची तपासणीनंतर केंद्रीय समिती शहरात विविध भागात जावून प्रत्यक्ष पाहणी करणार आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरातील 450 शहराची निवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी झालेल्या सर्वेक्षणाअंती जळगाव शहरातचा 162 वा क्रमांक आला होता. त्यांनतर पुन्हा मनपा प्रशासनाने स्वच्छ सर्वेक्षणाची तयारी सुरु आहे.
दोन दिवसात प्रत्यक्ष पाहणी
महापालिकेच्या अरोग्य विभागाकडून शहरातील स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात स्वच्छते संदर्भात जनजागृती, अस्वच्छतेबाबत तक्रार करण्यासाठी अॅप नागरिकांच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करणे,घंटागाडींवर स्वच्छतेविषयक संदेश प्रसारीत करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियातंर्गत देशभारातील हा उपक्रम आहे. याला गुणश्रेणी मार्कचा शेरा दिला जाणार आहे. 26 ते 27 या दोन दिवसात पथक पाहणीकरणार आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष स्पॉट पाहणी अधिकारी करणार आहेत.