स्वच्छ भारत अभियानाला सर्वोच्च प्राधान्य

0

फैजपूरचे नूतन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची ग्वाही

फैजपूर (प्रतिनिधी)- फैजपूर शहर हे ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. शहराची ओळख जशी काँग्रेसच्या पहिल्या ग्रामीण अधिवेशनमुळे निर्माण झाली तसे शहराचे सौंदर्यदेखील सुंदर असले पाहिजे हेच ध्येय मनाशी बाळगून फैजपूर शहर स्वच्छतेकडे नेण्याचा माझा मानस असल्याचे नूतन मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलतांना सांगितले.

नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांनी केले स्वागत
मुख्याधिकारी सुवर्णा ओगले शिंदे यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली मोहळ, जि. सोलापूर येथे झाल्याने त्यांच्या जागी निफाड येथून किशोर चव्हाण यांची फैजपूर पालिकेत बदली झाली. सोमवारी सकाळी 11 वाजता त्यांनी पालिकेत येऊन त्यांच्या पदाचा कारभार हाती घेतला. यावेळी नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांचा सत्कार केला

परीसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्यही राहिल निरोगी
चव्हाण यांनी सांगितले की, आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ असला तर आपले आरोग्यदेखील निरोगी राहते आणि आपल्याला दैनंदीन कामे करण्यास उत्साह वाटतो. शहर स्वच्छतेकडे मी विशेष लक्ष देणार आहे. शहरातील नागरीकांना मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासाठी आपण कटीबद्ध असून स्वच्छ भारत अभियानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि जे काम मी हाती घेतले ते पूर्ण करतोच. यासाठी पालिकेतील नगराध्यक्ष, नगरसेवक व कर्मचारी यांचेही मला सहकार्य मिळणार आहे. शहरातील नागरीकांनी आपल्या घरातील कचरा हा उघड्यावर न टाकता पालिकेच्या गाडीत टाकावा. नागरिकांनी आजूबाजूचा परीसर स्वच्छ ठेवून पालिकेला सहकार्य करावे. शहरातील नागरीकांनीच परिसर स्वच्छ ठेवला तर नक्कीच फैजपूर शहराचे नाव उज्वल होईल.

प्लॅस्टीक बंदी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी
प्लास्टिक बंदी हीपर्यावरण विभागाकडून करण्यात आली आहे. या प्लास्टिकमुळे गटारी व नाल्यात अडकून पाणी पुढे जाणे बंद होते त्यामुळे प्लास्टिक बंदी शहरात करणारच आहे. यासाठी गावातील सर्व व्यापारी वर्गाची एक बैठक बोलावून त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल. व्यावसायीकांनीच ग्राहकांना कॅरीबग देवू नये आणि ग्राहकांनी सुध्दा खरेदीसाठी घरातून बाहेर पडतांना हातात पिशवू घेवूनच निघावे. कॅरीबग मुले पर्यावरणाचा नाश होणार नाही यासाठी आपण स्वतः काळजी घेतली पाहिजे. शहराच्या हितासाठी अजून काही योग्य निर्णय घ्यावे लागले तर ते सर्वांना विश्वासात घेवून घेतले जातील, अशी ग्वाही मुख्याधिकार्‍यांनी दिली.

यांची होती उपस्थीती
सोमवारी सकाळी 11 वाजता मुख्याधिकारी यांनी पदभार घेतल्या नंतर त्यांचे पालिका सभागृहात स्वागत करण्यात आले. नगराध्यक्ष महानंदा टेकाम होले, उपनगराध्यक्ष कलीम मणियार, माजी उपनराध्यक्ष तथा नगरसेवक हेमराज चौधरी, भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, पालिका विरोधी पक्षनेते शेख कुर्बान, नगरसेवक प्रभाकर सपकाळे, रशीद तडवी, अमोल निंबाळे, देवेंद्र साळी, चंद्रशेखर चौधरी, रघुनाथ कुंभार, रविंद्र होले, यासाह पालिका कर्मचारी यांनी सुध्दा सत्कार केला.