स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन

0

नवी मुंबई । नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संकल्पसे सिध्दी या स्वच्छता उपक्रमांतर्गत 9 ते 15 ऑगस्ट, 2017 या कालावधीत विविध स्वच्छता विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने 14 ऑगस्ट 2017 रोजी ऐरोली कार्यक्षेत्रामधील स्वच्छ भारत मिशन यांच्याकडून प्राप्त झालेल्या सुचनेनुसार कचर्‍याचे वर्गीकरण हे कचरा निर्मितीच्या ठिकाणीच करण्याच्या दृष्टीने ओला कचर्‍यातील घटक हिरव्या कचरा कुंडीत व सुक्या कचर्‍यातील घटक निळ्या कचरा कुंडीत टाकणे याविषयी सर्व महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे बचतगटांसाठी टाकाऊपासून टिकाऊ या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष मोहिमेमध्ये नगरसेवक संजु वाडे, ऐरोली विभागाच्या अधिकारी स्वच्छताग्रही व स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.