नवापूर। स्वच्छ महाराष्ट्र् अभियान अंतर्गत नगर पालिकेचा महिलांसाठीचे सार्वजनिक शौचालयावर नवापुर हगणदारी मुक्तीचा संदेश व आकर्षक चित्र यातुन प्रचार प्रसार केला जात आहे. हगणदारीमुक्तीसाठी शासन प्रयत्न करत आहे. त्या प्रत्नांना यश येऊन उघड्यावर शौचास जाण्याची मानसिकता काही प्रमाणात बदलत होतांना दिसत आहे. याबाबत जनजागृतीसाठीटि. व्ही.वर जाहिरात करण्यात येत आहे. परंतु, आजसुद्धा 54 टक्के महिला व पुरुषांना त्यांच्याकडे संडास नसल्याने नाईलाजाने उघड्यावर दुर रात्री व पहाटे शौचालयास जावे लागते ही एक मोठी शोकांकिता आहे. आता यासाठी अक्षय कुमारचा टॉयलेट हा चित्रपट सुध्दा येत आहे.
एक क्रांतीकारी पाऊल
शासनाचा या प्रयत्नाने गाव हगणदारीमुक्त होत आहे. घर तेथे शौचालय यासाठी शासन प्रत्येकांला अनुदान देत आहे. यासाठी शासन गावाला पुरस्कार देऊन प्रोत्साहन देखील देत असतांना हे चित्र स्वच्छ भारताकडे जाण्याचे एक क्रांतीकारी पाऊल आहे. नवापूर नगर पालिका देखील जनजागृतीसाठी पुढे आली आहे. पालिकेतर्फे विविध ठिकाणी भिंती चित्र काढून जनजागृती करण्यात येत आहे.