पाचोरा। केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाला पाचोरा नगर परिषदेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून शहरात वैयक्तिक शौचालय योजनेत उद्दिष्टे पुर्ततेकडे वाटचाल करीत असल्याचे दिसून येत आहे. पाचोरा न.पा. ने जवळपास यंदाच्या वर्षभराचे उद्दिष्टे 1333 घेतले असून मुख्याधिकारी किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी आतापर्यंत 914 वैयक्तिक शौचालयमध्ये बांधून पूर्ण केले आहे तर नव्याने 196 प्रस्ताव दाखल होवून प्रस्तावित आहे. यासंपूर्ण प्रक्रियेत नगरपरिषदेकडे लाभार्थींनी प्रत्यक्ष संपर्क करूनच प्रस्ताव सादर करावे व या प्रक्रियेत कुठलीही आर्थिक प्रलोभने कुणालाही देवू नये, यासाठी न.पा. पारदर्श कारभारासाठी प्रयत्नशिल आहे.
उघड्यावर बसणार्यांवर करवाईसाठी माहिला पथकाची स्थापना
नगरपरिषदेच्या अंतर्गत आतापर्यंत गुडमॉर्निंग पथकाने पुरुषांवरच कार्यवाही केली आहे. त्यामुळे उघड्यावर महिला शौचालय करण्याचे प्रमाण वाढल्याने महिलांवर कार्यवाही करण्यासाठी महिला पथकाची स्थापना झाली असून आरोग्य विभागाच्या जवळपास 12 महिलांची स्वतंत्ररित्या तयार करण्यात आली आहे. या महिला शहरात उघड्यावर शौचालय करणार्या महिलांवर कार्यवाही करणार आहेत. सकाळी 6 ते 9 व सायंकाळी 7 ते 10 या वेळेत ही कार्यवाही होणार असल्याने महिलांवर कार्यवाहीची संक्रांत येणार आहे. नगरपरिषदेच्या गुडमॉर्निंग पथकाला पोलिस निरीक्षक नवनाथ तांबे यांच्यासह त्यांच्या सहकार्यांचे सहकार्य लाभले आहे.
शासनाकडून 15 हजाराचे अनुदान
या योजनेसाठी कमीत कमी कागदपत्रे नगरपरिषदेत जमा करावयाची असून आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, ऑनलाईन खात्याचे बँक पुस्तकाची झेरॉक्स, शौचालय बांधकामासाठी जागा उपलब्ध असावी या अटी असून लाभार्थी नागरिकांनी प्रत्यक्ष नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करावा असे आवाहन आरोग्य निरीक्षक धनराज पाटील यांनी केले असून लाभार्थीनी कागदपत्रे पुर्तता केल्यावर 24 तासात प्रकल्प मंजूरी मिळत आहे. यात 15 हजार रुपये अनुदान केंद्र सरकार, राज्य सरकार व न.पा. निधीतून मिळणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थीनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.