स्वच्छ महाराष्ट्र अभियानात यमुनानगर रुग्णालय, सयाजी हॉटेल प्रथम

0

पिं.चि.मनपा माध्यमिक विद्यालय थेरगाव, मनपा शाळा मुले पिंपळे निलख, पलाश को हौ सोसायटी ः वाकड, यांनी पटकाविला क्रमांक

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत स्वच्छता स्पर्धांचा निकाल जाहिर

पिंपरी चिंचवड ः शहरात स्वच्छ सर्वेक्षण – 2020 शहरामध्ये सुरु आहे. व्यापक स्वरुपात नागरिकांचा व समाजातील सर्व स्तरांचा सहभाग स्वच्छ भारत अभियानामध्ये होण्यासाठी त्यांच्याशी माहिती, शिक्षण व संवाद साधून त्यांच्या वर्तनातील बदल घडवणे. या उद्देशाने हे सर्वेक्षण राबविण्यात येत आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील स्वच्छ हॉटेल्स, शाळा, हॉस्पीटल्स, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई या सहा गटामध्ये स्वच्छता स्पर्धांचे प्रथम लीग (एप्रिल ते जुन) आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये, यमुनानगर रुग्णालय, मे. सयाजी हॉटेल लि. वाकड, पिं.चि.मनपा माध्यमिक विद्यालय थेरगाव, मनपा शाळा मुले पिंपळे निलख, पलाश को हौ सोसायटी ः वाकड (ड क्षेत्रीय कार्यालय) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.

विविध निकषांवर गुणांकन…
परिसर स्वच्छता, शौचालय सुविधा, स्वच्छता साधनांचा वापर, ओला व सुका कचरा कचरा वर्गीकरण, पायाभुत सुविधा, स्वच्छता ऍप डाऊनलोड आदी निकषांच्या आधारे गुणांक देण्यात आले आहे. स्वच्छता स्पर्धेमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील संस्थांनी सहभाग घेतला. स्पर्धेकरीता अर्ज व इतर माहिती हॉटेल्स, रुग्णालयाकरीता वैद्यकिय विभाग, शाळा – शिक्षण मंडळ, गृहनिर्माण संस्था / मोहल्ला मार्केट / मंडई याकरिता क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये गुणांकनानुसार क्रमांक काढण्यात आलेला आहे. अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली आहे.

दवाखाने / हॉस्पीटल :
यमुनानगर रुग्णालय, ओटा स्कीम निगडी ः प्रथम क्रमांक
जिजामाता हॉस्पीटल पिंपरी ः द्वितीय क्रमांक
केएसपीएस/तालेरा रुग्णालय चिंचवड गाव ः तृतीय क्रमांक

स्वच्छ हॉटेल :
मे. सयाजी हॉटेल्स लि. वाकड ः प्रथम क्रमांक
मे. मिरॅकल व्हेन्चर ताथवडे ः द्वितीय क्रमांक
मे. म्हस्के लेशर प्रा.लि. एमआयडीसी भोसरी ः तृतीय क्रमांक
मे. हॉटेल शिवाई एमआयडीसी पिंपरी ः तृतीय क्रमांक

स्वच्छ शाळा : (माध्यमिक विभाग)

पिं. चि.मनपाचे माध्य. विद्यालय थेरगाव पुणे 33 ः प्रथम क्रमांक
माध्यमिक विद्यालय पिंपळे गुरव ः द्वितीय क्रमांक
राजीव गांधी माध्यमिक विद्यालय नेहरुनगर ः द्वितीय क्रमांक
क्रिडा प्रबोधनि विद्यालय नेहरुनगर ः तृतीय क्रमांक

स्वच्छ शाळा : (प्राथमिक विभाग)

मनपा शाळा मुले पिंपळे निलख ः प्रथम क्रमांक,
मनपा शाळा श्रमिकनगर यांना ः द्वितीय क्रमांक
मनपा शाळा मोहननगर मुले ः तृतीय क्रमांक
मनपा शाळा भुमकर वस्ती वाकड ः तृतीय क्रमांक
मनपा शाळा रावेत ः तृतीय क्रमांक
मनपा शाळा कस्पटे वस्ती वाकड ः तृतीय क्रमांक

स्वच्छ शाळा गृहनिर्माण संस्था :
पलाश को हौ सोसायटी ः वाकड (ड क्षेत्रीय कार्यालय) ः प्रथम क्रमांक.
ग्लिटराटी अपार्टमेंट – पिंपळे निलख (ड क्षेत्रीय कार्यालय) ः द्वितीय क्रमांक
फलोरेन्सीया सहाकारी गृहनिर्माण संस्था वाकड (ड क्षेत्रीय कार्यालय)ः तृतीय क्रमांक

स्वच्छ मंडई :
संत ज्ञानेश्‍वर भाजी मंडई भोसरी ः इ क्षेत्रीय कार्यालय ः प्रथम क्रमांक
कै. बाबुराव शंकरराव तापकीर भाजी मंडई चर्‍होली, इ क्षेत्रीय कार्यालय ः द्वितीय क्रमांक