स्वच्छ शहरासाठी पुढाकार हवा

0

भुसावळ। स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून देशातील दुसर्‍या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून भुसावळ शहराचे नाव घोषीत करण्यात आले. यामुळे भुसावळकरांवर मोठी नामुष्की ओढविली असून शहराला लागलेला कलंक पुसण्यासाठी सत्ताधारी, विरोधक आणि शहरातील विविध समाजसेवी संघटना एकत्र येत रविवार 7 रोजी पासून शहरात स्वच्छता अभियान राबविण्याचे निश्‍चीत करण्यात आले. 6 मे रोजी सकाळी पालिकेच्या सभागृहात स्वयंसेवी संस्था, नगरसेवक व पालिका प्रशासनाची बैठक झाली. या बैठकिला नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर, प्रा.सुनिल नेवे यांसह नगरसेवक व स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकित नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगरसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर स्वयंसेवी संस्थांचे नरविरसिंह रावळ, पंकज पाटील, प्रा.जयेंद्र लेकुरवाळे, डॉ.दावलभक्त आदींनी मनोगत व्यक्त करुन सुचना मांडल्या. रविवार 7 रोजी सकाळी 7 वाजता पालिका प्रशासन व स्वयंसेवी संंस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते नगरपालिकेच्या आवारात एकत्र जमणार आहेत. येथे शहराच्या 4 भागांचे नियोजन करुन स्वच्छता अभियानाचा श्री गणेशा केला जाणार आहे.

नगरसेवकाने वार्डात घ्यावा स्वच्छता मेळावा
या बैठकित नगरसेवक निर्मल कोठारी यांनी आपले मत मांडतांना शहर स्वच्छतेसाठी स्वयंसेवी संस्थांना आर्थिक भुर्दंड का देतात. 2 दिवसात शहर स्वच्छ केले जावू शकते. प्रत्येक नगरसेवकाने आपल्या कार्यकर्त्यांना स्वच्छतेसाठी कामाला लावले तर 4 ते 5 दिवसात शहरातील संपुर्ण कचरा साफ होईल असे सांगितले. नगरसेवक प्रा.सुनिल नेवे यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रत्येक नगरसेवकाने आपल्या वार्डात स्वच्छतेचा मेळावा घ्यावा. स्वच्छतेचे नियोजन करावे असे सांगीतले.

या संस्थांचा आहे सहभाग
शहरात स्वच्छतेसंदर्भात नागरीकांनी काय करावे व काय करू नये यासाठी सामाजिक विचार मंचतर्फे पत्रक तयार करुन त्याचे नागरीकांमध्ये वाटप केले जाणार आहे. या बैठकीत अर्जुना बहुउद्देशीय संस्था, संस्कृती फाउंडेशन, रोटरी क्लब भुसावळ, रोटरी क्लब आयुध निर्माणी, रोटरी क्लब रेल सीटी, राजेश्री संघमित्रा महिला बहुउद्देशीय संस्था, जागर प्रतिष्ठान, ज्येष्ठ नागरीक संघ, श्रीराम राज्य फाउंडेशन, वंशीता प्रतिष्ठान, अर्ंतनाद प्रतिष्ठान, सिल्हवर लाईन स्पोर्टस अकॅडमी आदी स्वयंसेवी संस्थांचा सहभाग होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यास सुरवात केली. या अभियानाची अंमलबजावणी करतांना अपुर्ण मनुष्यबळ, स्वच्छतेसाठी लागणार्‍या साहित्याची कमतरता आदीची वारंवार माहिती देवून लोकसहभा देण्याचे आवाहन करण्यात आले होते.

कर्मचारी गोळा करावे
हाच कित्ता दुसर्‍या वर्षी गिरवण्यात आला. 7 मे पासून सुरु होणार्‍या स्वच्छता अभियानाच्या बैठकित पुन्हा त्याची पुनरावृत्ती करण्यात आली. पालिकेकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. परंतु जेव्हा पालिकेने अतिक्रमण निर्मुलन अभियान राबविले होते तेव्हा मोठ्या प्रमाणात पालिकेचे कर्मचारी शहरातील नागरीकांना पहावयास मिळाले. जर पालिकेने त्याच पध्दतीने कर्मचारी गोळा करुन अभियान राबविले तर परिणाम निश्‍चीतच प्रभावी दिसतील.