तीन महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या रविवारी केली जाते स्वच्छता
अभियानाचे होतेय सर्वत्र कौतुक;
अमळनेर- मंगळ ग्रह सेवा संस्थेने तीन महिन्यांपासून दर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्या रविवारी स्वच्छ शहर मंगल अभियान सुरु केले आहे . या अभियानांतर्गत शहरातील विविध भागात संस्थेचे सर्व पदाधिकारी व सेवेकरी आणि काही सामाजिक कार्यकर्ते मिळून खराटे, झाडू, पावडी, टिकम, टोपल्या व हातांनीही स्वच्छता अभियान राबवितात. यात कोणतीही निव्वळ चमकोगिरी तथा फोटोगिरी नसते. त्यामुळे आतापर्यंत जेथे जेथे हे अभियान राबविले गेले त्या त्या भागातील नागरिकांनी खूप कौतुक केले आहे. या अभियानास प्रत्येक वेळी अमळनेर नगरपालिकेचेही भरीव सहकार्य लाभले आहे.
यांनी घेतला सहभाग
आतापर्यंत वाडीचौक, कसालीमोहल्ला, झामी चौक, शाळा क्र. 12 परिसर, ब्रमहें गल्ली, राजहोळी चौक, तांबेपुरा, साने नगर परिसर, मुंबई गल्ली ते स्टेट बँक पर्यंतचा परिसर येथे हे अभियान राबविले गेले आहे. या महिन्यात काही कारणास्तव शनिवारी हे अभियान राबविण्यात आले. त्यात लायन्स व लायनेस क्लबनेही सक्रीय सहभाग घेतला. यात लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी, लायनेस क्लबच्या अध्यक्षा प्रा. नयना नवसारीकर, खा.शि.मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, अर्बन बँकेचे संचालक पंकज मुंदडे, डॉ. मिलिंद नवसारीकर,येजदी भरुचा, महावीर पहाडे, राजू नांढा, सुशील जैन, जसमीन भरुचा, वैशाली पहाडे, रुपाली सिंघवी, सोनाली मुंडडे, पप्पूशेठ सैनानी, महेश मुंदडे आदींसह अनेकांचा सहभाग होता.
सहभागींचा सत्कार
अभियानातील मंडळी नगरपालिके जवळ पोहोचल्यावर मुख्याधिकारी शोभाताई बाविस्कर यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.येन. पाटील, सचिव एस.बी. बडगुजर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीष कुलकर्णी, विश्वस्थ अनिल अहिरराव, सेवेकरी उज्वला शाह, सुनीता कुलकर्णी, जयश्री साबे, जे.डी. कोठावदे, आत्माराम साबे आदींचे बुके देऊन स्वागत केले.
परिसरात केली स्वच्छता
यावेळी बांधकाम सभापती मनोज पाटील, फयाजखान पठाण, संतोष लोहेरे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी उपस्थित होते. या सर्वानीही काही वेळ अभियानात सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान सुभाष चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची व परिसराची पूर्णपणे साफसफाई करून त्यास माल्यार्पण सुनीता कुलकर्णी यांनी केले. तर साने गुरुजींच्या पुतळ्याची व परिसराची पूर्णपणे साफसफाई करून त्यास डिगंबर महाले यांनी माल्यार्पण केले.