भुसावळ। स्वच्छ भारत अभियानांतर्गत भुसावळ शहराचा देशातील दुसर्या क्रमांकाचे अस्वच्छ शहर म्हणून जाहीर झाल्यानंतर पालिका प्रशासनासह सामाजिक संस्थांना खळबडून जाग आली. शहराला लागलेला हा अस्वच्छतेचा कलंक पुसून काढण्यासाठी आता राजकीय पदाधिकार्यांसह सामाजिक संस्था देखील सरसावल्या असून शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. येथील जीवनज्योती फाऊंडेशन व मध्य रेल्वेच्या सेंट्रल मजदूर युनियनच्या पदाधिकार्यांनी हाती झाडू आणि फावडे घेऊन तर्फे शहरातील विविध भागात साफसफाई करण्यात आली.
अभियानात यांनी घेतला सहभाग
तसेच या स्वच्छता अभियानात कोटेचा महिला महाविद्यालयाच्या व्याख्याता सरोज शुक्ला, डि.एस. हायस्कुलच्या प्राध्यापिका राजश्री सपकाळे, सीआरएमएसचे अध्यक्ष व्ही.के. समाधिया, तोरणसिंग, आर.डी.घोष, ललिता धांडे, दिपाली धांडे, अशोक पांडव, गणेश परदेशी, जीवन ज्योती फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. ज्योती सोनवणे, गोपाळ सोनवणे, नविन सोनवणे, नेहा सोनवणे यांनी सहभाग घेतला.
सांडपाण्याचा अडथळा केला मोकळा
येथील जीवनज्योती फाऊंडेशन व सीआरएमएस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 10 रोजी न्यू जवाहर डेअरी पासून ते आठवडे बाजारापर्यंत स्वच्छता करण्यात आली. या परिसरातील गटारी मोठ्या प्रमाणावर तुंबल्या असून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. या पदाधिकार्यांनी येथील कचरा बाहेर काढला.
योग्यरित्या विल्हेवाट
या संघटनांतर्फे दर आंठवड्याला शहरात विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. संकलित करण्यात करण्यात आलेला कचरा हा शहराबाहेर डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात आला. यानंतर आता शनिवार 13 रोजी सकाळी 7 वाजता रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी यात शहरातील नागरिकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.