स्वच्छ सर्वेक्षण अभियानात जळगाव मनपा देशात 79 क्रमाकांवर

0

जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर

जळगाव– स्वच्छ भारत अभियानांतर्गंत केंद्र शासनाच्यावतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे. महानगरपालिकेत या योजनची अंमलबजावणी केली जात आहे. स्वच्छ सर्वेक्षणचा जुलै ते सप्टेंबर तिमाहीचा निकाल जाहीर झाला असून स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव मनपा देशातील 3971 शहरांमध्ये 79 व्या क्रमांकावर आहे. मागील तीमाहीमध्ये 131 स्थानी होते.तर यातीमाहीमध्ये 79 क्रमाकांवर आहे. दरम्यान,ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंतच्या तपासणीसाठी या महिन्यात समिती येणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासमोर देशात क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी मोठे आव्हान असणार आहे.

तिमाहीमध्ये समाधानकारक

स्वच्छ भारत अभियानातंर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबवले जात आहे. यात 2019-20 या आर्थिक वर्षात दर तीन महिन्यांचे सवेक्षण करण्यात आले आहे. दर तीन महिन्यांनी सर्वेक्षण करुन रँकींग निश्तिच केले जाते. याकरीत ऑनलाईनमाहिती देखील दिली जाते. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला त्यात जळगाव शहराचा 3971 शहरांमध्ये 79 वा क्रमांक आला आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये जळगाव शहराचा 78 वा क्रमांक आला होता. परंतु गेल्या सहा महिन्यात साफसफाईसाठी एकमुस्त ठेका देवूनही समाधानकारकपणे स्वच्छतेकडे लक्ष दिले गेले नाही.

केंद्रीय समितीच्या पथकामार्फत होणार तपासणी

तिसर्‍या तिमाहीसाठी 4 ते 31 जानेवारीदरम्यान केंद्रीय समितीच्या पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. शेवटच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या अभिप्रायासाठी 1500 गुण , प्रत्यक्ष तपासणीसाठी 1500 गुण तर स्टार रेटिंगसाठी 1000 गुण देण्यात येणार आहे. तसेच शहरात स्वच्छतेसाठी राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांसाठी देखिल गुण दिले जाणार आहेत. शहरातील साफसफाईसाठी मनपा प्रशासनाने एकमुस्त मक्ता दिला आहे.मात्र पुरेश्या यंत्रणेमुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येवू नये म्हणून अंतिम नोटीस बजावली आहे. त्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची हालचाल प्रशासनाने केली आहे. साफसफाईसाठी पर्यायी व्यवस्था न केल्यास पून्हा रँकींग घसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.