स्वच्छ सर्वेक्षण केंद्रीय समिती सोमवारी शहरात

0

जळगाव । सोमवारी शहरात स्वच्छ सर्वेक्षण पथक दाखल होणार आहे. हे पथक टप्या टप्याने काम करणार आहे. यात पहिल्या टप्प्यांत महापालिकेेने राबविलेल्या स्वच्छतेेसंबंधीत कागपदत्रांची तपासणी करणार आहे. यानंतर प्रत्यक्ष शहरात जावून स्थळ भेट देवून तपासणी केली जाणार आहे. तसेच पुढील टप्प्यांत महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या स्वच्छतेबाबतच्या उपयायोजनांबाबत नागरिकांचा अभिप्राय घेण्यात येणार आहे. मागील वर्षी महापालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशाभरातून 450 शहरांतून 162वा क्रमांक आला होता. यावर्षी शहरा पहिल्या 100 शहरांत आणण्याचा मानस अप्पर आयुक्त चंद्रकांत खोसे यांनी बोलून दाखविला.

कचरा प्रक्रीया प्रकल्प नसल्याने होणर नुकसान
नागरिकांना स्वच्छ सर्वेक्षणबाबत केंद्रीय समिती फोन किंवा प्रत्यक्ष भेट घेवून प्रश्‍न विचारणार आहे. यात आपले जळगाव शहर स्वच्छ सर्वेक्षणात 2018 स्पर्धेत सहभागी आहे हे आपणास माहिती आहे काय ? मागील वर्षांच्या तुलनेत आपले शहर स्वच्छ आहे का ? शहरात ठेवलेला सार्वजनिक कचरा कुंडींचा आपण वापर करता का ? आपल्या घरातून वर्गीकृत ओला व सुका कचर्‍याचे संकलन केले जाते का ? आदी प्रश्‍न विचारण्यात येणार आहे. दरम्यान, महापालिकेतर्फे कचर्‍यावर प्रक्रीया करण्यसाठी प्रकल्प सुरू नसल्याने शहराचे गुण कमी होण्याची शक्यता आहे. कचरा संकलन व्यवस्थीत होत असले तरी त्यावरील प्रक्रीया केली जात नसल्याने शहराच्या गुणांवर परिणाम होणार आहे.