स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना

0

धुळे । येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेची स्थापना करण्यात आली असून या शाखेचे उद्घाटन झाले. जिल्ह्यात आर्थिक फसवणूकीचे व अपहाराचे गुन्हे घडत असतात. सदर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात स्वतंत्र आर्थिक गुन्हे शाखेचे निर्मिती करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे उद्घाटन पोलिस अधिक्षक एम.रामकुमार यांच्याहस्ते करण्यात आले.

यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपअधिक्षक रवींद्र सोनवणे, श्रीकांत घुमरे, पोलिस निरीक्षक डी.एस.गवळी, आनंद निकम, दिलीप गांगुर्डे, पीएसआय गवळे आदी उपस्थित होते.