उद्योगमंत्र्यांकडे अभय भोर यांची मागणी
पिंपरी : फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे स्वतंत्र औद्योगिक महानगरपालिका स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वात आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक होता. सध्या औद्योगिक क्षेत्र ओस पडू लागले, असे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. महानगरपालिका आणि राज्य शासनाने त्वरित लक्ष न दिल्यास फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही भोर यांनी दिला.
भोर पुढे म्हणाले की, एकेकाळी आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका मान मिळवलेल्या पिंपरी-चिंचवड औद्योगिक परिसरात गेली पस्तीस ते चाळीस वर्ष उद्योजकांना लागणार्या मूलभूत कुठल्याही सुविधा मिळत नाहीत. उदाहरणार्थ पावसाळ्याच्या काळामध्ये पाणी जाण्यासाठी किंवा सेफ्टी टँकसाठी ड्रेनेज सुविधा आतापर्यंत महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही. महिलांसाठी टॉयलेट कचरापेट्या काही ठिकाणी महानगरपालिकेने औद्योगिक परिसरात सीसीटीव्ही लावावेत व अंतर्गत वाहतूक कुठल्याही प्रकारची नाहीये नगरपालिकेचे पूर्णपणे औद्योगिक परिसराकडे दुर्लक्ष आहे औद्योगिक परिसरात याचा कुठलाही वापर उद्योजकाला करता येत नाही. आधीच शासनाकडून सवलती मिळत नसल्यामुळे येथील उद्योग स्थलांतरित होत आहेत. औद्योगिक क्षेत्रातील वाहन उद्योग, फार्मासिटिकल तसेच बर्याच मोठ्या कंपन्यांनी आपले उत्पादन बाहेरच्या राज्यात हलविल्यामुळे या कंपन्यांवर अवलंबून असणारे कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे.
हे देखील वाचा
शहरात व्यवसाय परवडत नाही
व्यवसाय करण्यासाठी अनेकांनी बँका, वित्तसंस्था अथवा खाजगी सावकाराकडून व्याजाने कर्ज काढले आहे. त्यामुळे कर्जाच्या खाईत लोटले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान राज्य व केंद्र सरकारचे कामगार विषयक धोरण पूरक धोरण कामगारांचे आंदोलन अशा अनेक कारणांमुळे व बाहेरील देशातील कंपन्या यांच्या आगमनामुळे या परिसरात व्यवसाय करणे परवडत नसल्याचे काही कंपन्यांच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.