स्वतंत्र ग्रामपंचायत मागणीसाठी नागरिकांनी घेतला पुढाकार

0

रावेर । रावेर नगरपालिकेच्या हद्दीलगत मोठ्या प्रमाणात रहिवाशी वस्ती वाढली आहे. परंतु त्यांना पुरेशा सोयी -सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी रविंद्र पवार यांच्या माध्यमातून एकत्र येवून रावेर ग्रामीण नावाने स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी आणि यासाठी शक्य तेवढा पाठपुरावा देखील करणार असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

हद्दवाढीच्या प्रस्तावाला 25 वर्षांपासून चालना मिळेना
नागरपालिकेला लागून जवळपास 10 ते 12 हज़ार लोकसंख्येची अष्टविनायक नगर, श्रीकृष्ण नगर, पीपल्स बँक कॉलनी, विद्या नगर, रामचंद्र नगर, सौभाग्य नगर, तिरुपति नगर, विश्वकर्मा नगर, गोपाल नगर, जिजाऊ नगर, शिवम नगर, उटखेडा रोड, तडवी कॉलनी, जीआयएस कॉलोनी अशा विविध व मोठ्या लोकसंख्येच्या नागरी वसाहती या परिसरात वाढल्या आहेत. परंतु रावेर नगरपालिकेच्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला गेल्या 25 वर्षांपासून चालनाच मिळत नाही अशी अशी खंत यावेळी नागरिकांनी व्यक्त केली. नागरिकांना वेळोवेळी पूर्ण सुविधा मिळाव्यात यासाठी हे सर्व ग्रामस्थ एकत्र येवून नविन ग्रामपंचयतीसाठी शासनाकडे मागणी करणार आहेत.

बैठकीस यांची होती उपस्थिती
सदर बैठकीचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्या मंदिर येथे करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजीव पाटील हे होते. तर बैठकिला रविंद्र पवार, अनिल पाटिल, सोपान पाटिल, भाटखेडा व रावेर स्टेशनचे सरपंच तसेच ग्रामसेवक, शरद राजपूत, विश्वनाथ पाटील, बी.डी. पाटील, दिलीप वैद्य, भगवान चौधरी, जयंत कुलकर्णी, राजधर पाटिल, फिरोज तडवी यांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश पाटील तर आभार विश्वनाथ पाटील यानी मानले.