स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभाग निर्माण करणार -मुख्यमंत्री

0

नागपूर: अर्थ व सांख्यिकी संचालनालय, माहिती तंत्रज्ञान संचालनालयात समाविष्ट करुन स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभाग निर्माण करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.

स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्थितीबाबतचा प्रश्न सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, माहिती तंत्रज्ञान विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. लवकरच हा स्वतंत्र विभाग करणार आहोत. या खात्याचा कारभार माझ्याकडेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राहुल नार्वेकर, हेमंत टकले आणि जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.