नागपूर : लॉटरी लागली, विदेशातून पार्सल आलें आणि तुमच्या बँकेतून बोलतो, अशा स्वरूपाचे भ्रमणध्वनी करून तुमची माहिती मिळवून ऑनलाईन फसवणूक करणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकरणांची तक्रार देण्यासाठी नागरिकांना इतरत्र भटकण्याची आवश्यकता नाही. ‘सायबर गुन्ह्या’संदर्भात सर्व तक्रारी आता आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाशेजारी असणार्या ‘सायबर तक्रार केंद्रा’त स्वीकारल्या जातील आणि येथून प्रत्येक तक्रारीचा तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली.