स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी सत्ताधारी नगरसेवकाचा राजीनामा : माजी आमदार राजीव देशमुख

0

चाळीसगाव: सत्तेमध्ये असून स्वतःचा नाकर्तेपणा लपविण्यासाठी खोटे आरोप करायचे, कुठलाही कर्मचारी चुकत असेल तर त्याला पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही, मात्र हे जर कर्मचाऱ्यांना चुकीचे काम करायला सांगणार असतील तर तो कसा करेल? यांच्या वॉर्डतील विषय घेतला नाही म्हणून सभा वेठीस धरायची. काम झाले तर क्रेडिट घ्यायचे आणि नाही झाले तर दुसऱ्यावर आरोप करायचे हे थोतांड आहे. सत्ताधरी पक्षातील नगरसेवक घृष्णेश्वर पाटील स्वत:चा नाकर्तेपणा लपविण्यासाठी राजीनामा दिल्याचे आरोप माजी आमदार राजीव देशमुख यांनी केले.

कै.अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीचे नेते माजी आमदार राजीवदादा देशमुख यांनी आज गुरुवारी पत्रकार परिषद घेत आरोप केले. यावेळी गटनेते राजीव देशमुख, उपगटनेते सुरेश स्वार, शहर विकास आघाडीचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष शाम देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक आनंदा कोळी, सुरेश चौधरी, रवींद्र चौधरी, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, शेखर देशमुख, सदाशिव गवळी, फकीरा बेग, जगदीश चौधरी, योगेश पाटील, शुभम पवार, प्रताप भोसले, आकाश पोळ, सोनु अहिरे, कुणाल पाटील, कौस्तुभ राजपूत, राजेंद्र मोरे, जलसाक्षर दुत स्वप्नील कोतकर , प्रदीप राजपुत आदी उपस्थित होते.