मुंबई: सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा वातावरण आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सुर्ष्टीतले सर्व कलाकार घरी गणेशाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळते आहे. मराठी चित्रपटाची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिनेदेखील तिच्या घरी इकोफ्रेन्डली गणेशाची स्थापना केली आहे. यासाठी तिने खास शाडूच्या मातीचा गणपती बनवला आहे.
सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवताना दिसत आहे. गेली काही वर्षें आम्ही शाडूमातीची मूर्ती आणत असू. या वर्षी माझ्या भावाने अतुलने एक नवीन कल्पना सहजच सुचवली, की आपण ही मूर्ती स्वत:च बनवू, आणि म्हणून पहिल्यांदाच नकळत आम्ही ही प्रथा सुरू केली, असे सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहले आहे.