नवी दिल्लीः लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण, अशी अवस्था काँग्रेसच्या खासदार रंजीत रंजन यांची झाली आहे. विवाह सोहळ्यांमधील उधळपट्टीला चाप बसवण्याची मागणी करणार्या रंजन यांनी मात्र स्वत:च्या लग्नात पाण्यासारखा पैसा वाहिला होता. लग्नाला पोहोचण्यासाठी रंजीत रंजन यांनी चार्टर्ड विमान वापरले होते. इतकेच नाही तर त्यांच्या लग्नात रिसेप्शनसाठी एक लाख पाहुणे आले होते. न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार खासदार रंजीत रंजन यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबासोबत जालंधर ते विवाहस्थळापर्यंत विमानाने प्रवास केला होता. 1994 साली त्यांचे लग्न झालेले आहे. त्यांच्या या शाही विवाहसोहळ्यासाठी 200 एकरात पसरलेलं मैदान बूक करण्यात आले होते. दिमतीला घोडे आणि हत्ती होते ते वेगळेच.