नागपूर – आमदार निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये जाण्यापूर्वी माझ्याशी चर्चा केली होती. त्यावेळी त्यांनी सांगितलेल्या कारणांमध्ये काही तथ्य नाही, असे म्हणत स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. जातीयवादी पक्षांचा पराभव करण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र येत आहेत. पण हे होत असल्यास सन्मानपूर्वक जागावाटप झाले पाहिजे. यावर पुढील काही गोष्टी अवलंबून असल्याचेही अजित पवार यावेळी म्हणाले.