स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात; शरद पवार मोदींवर बरसले

0

अहमदनगर: आज अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे आघाडीचा उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यात आली. यावेळी बोलतांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलेच तोंडसुख घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आतापर्यंत गांधी परिवाराला शिव्या घातल्या. आता पवार कुटुंबीयांवर टीका करत आहे. वर्ध्याला माझ्याबद्दल बोलले. आमच्या कुटुंबावर बोलता. सांगतात काय, आमच्या घरात भांडणे आहेत. अरे स्वत:ला घर नसलेले आमच्या घरात डोकावतात अशी जहरी टीका शरद पवार यांनी केली. दरम्यान यावेळी पवार यांनी उगाच जादा बोलत नाही. महाराष्ट्र लुंग्यापुंग्याच्या टीकेला मोजत नाही, असेही सांगितले.

मोदी पाहिजेल ते करतात …
लोकांचा समज होता की, माझे आणि मोदींचे चांगले संबंध आहेत, होतेही. ते मुख्यमंत्री होते. मी देशाचा कृषिमंत्री होतो. देशातला कोणताही मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आला की मदत करण्याची भूमिका होती. त्यावेळी पक्ष बघायचा नाही. एके दिवशी मोदी कुठंतरी म्हणाले, शरद पवार यांच्या बोटाला धरून मी राजकारणात आलो. ‘काय गडी भारी ए.., पाहिजेल ते करतो आणि रोज माझे धरतो,’ असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.