जळगाव। शहरातील शाहुनगरजवळील हौसिंग सोसायटीमधील दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्राच्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावर तरुणाने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेतले. त्यानंतर पेटलेल्या अवस्थेतच तिसर्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून दिल्याची खळबळजनक व थरारक घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता घडली. जिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना त्याचा पावणेपाच वाजता तरूणाचा मृत्यू झाला. शुभम ज्ञानेश्वर महाजन (वय 23 रा. गुढे ता. चाळीसगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. शुभम हा अभ्यासात हुशार आणि मनमिळावू स्वभावाचा असल्याने त्याने आत्महत्या का केली असावी? याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही. घटनास्थळावर पोलिसांना शुभमची चप्पल आणि बॅग मिळून आली असून शुभम याचे बी.टेकचे शिक्षण झाले होते. तर गेल्या दोन ते तीन वर्षापासून तो स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करत होता.
शाहू नगरातील दिपस्तंभ स्पर्धा परिक्षा केंद्राच्या मारतीमध्ये स्पर्धा परिक्षेचे क्लास होतात. तसेच येथे अभ्यासिका देखील आहे. त्यातच स्पर्धा परिक्षेची तयारी करणारा गुढे येथिल शुभम ज्ञानेश्वर महाजन हा मागील वर्षीचा दीपस्तंभ क्लासला असलेला विद्यार्थी असल्यामुळे तो अधून-मधून क्लास सोडल्यानंतरही अभ्यासिकेत अभ्यासासाठी तसेच मित्रांना भेटण्यासाठी जळगावात यायचा. त्यामुळे आज मंगळवारी देखील शुभम अभ्यासिकेत मित्रांना भेटण्यासाठी आला होता. त्यानंतर अभ्यासिकेत रिंडींगला बसल्यानंतर दुपारी तो तिसर्या मजल्यावरील गच्चवर असलेल्या बाथरुमकडे गेला. गच्चवरील बाथरुमकडे आल्यानंतर शुभम याने त्याच्या जवळ असलेले पट्रोल अंगावर घेत स्वत:ला पेटवून दिले. त्यानतंर त्याने तश्याच पेटलेल्या अवस्थेत स्वत:ला तिसर्या मजल्यावरुन सरळ खाली झोकून दिले. ज्या दिशेला त्याने झोकून दिले. त्या बाजूला असलेल्या बदामाच्या वृक्षाच्या दोन तीन फांद्यावर अडकत त्या फांद्या तुटल्यानतंर तो खाली जमिनीवर पडला.
उपचार घेतांना मृत्यू…
जिल्हा सामान्य रूग्णालयात शुभमला दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्याच्या उपचार सुरू केले. मात्र, 70 ते 80 टक्के भाजल्या गेल्यामुळे शुभमची प्रकृति चिंताजनक होती. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यास वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. त्या दरम्यान, उपचार सुरु असतांनाच काही जणांनी त्याची माहीती मिळवून चाळीसगाव येथे त्याच्या नातेवाईकांना फोन केले. यातच त्याच्यावर उपाचार करणार्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची सुरतवाला यांनी पावणेपाच वाजता शुभमला मृत घोषीत केले. यावेळी युजवेंद्र महजनांसह क्लासच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती. शुभमच्या नातेवाईकांनी त्याच्या ओळखीच्या मित्रांना घटनेबाबत माहिती विचारली मात्र, कुणीही काय झाले हे माहित नसल्याचे सांगत होते. यातच शुभमने आत्महत्या का केली असावी? हे अद्याप स्पष्ट झालेली नाही.
दृश्य पाहून विद्यार्थी देखिल भेदरले
शुभम पेटलेल्या अवस्थेत जमीनीवर पडताच जोरात आवाजा आला आणि कशाचा आवाजा आला हे पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्लासच्या बाहेर धाव घेतली. यात त्यांना शुभम हा पेटलेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसला. शुभम खाली ज्या बाजुला पडला त्या ठिकाणी काही विद्यार्थी पाणी पीत होते. त्यांच्याजवळच बदामाच्या झाडावरुन पेटलेल्या अवस्थेत शुभम पडला. हे दृश्य पाहून विद्यार्थी देखिल भेदरलेत. अवघ्या वेळातच या ठिकाणी विद्यार्थी व शिक्षक जमा झाले. पाणी पित असलेल्या विद्यार्थ्यांनी व परिसरातील विद्यार्थ्यांनी लागलीच जमिनीवरील खडी व पाणी शुभमच्या अंगावर टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला. पाणीचा मारा सुरूच ठेवल्यानंतर आग विझली. त्यानंतर भाजलेला शुभमला जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात नेले. त्यानतंर 108 क्रमांकाची रुग्णवाहीका आल्याने त्यास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शुभम अतिशय हुशार विद्यार्थी
शुभम ज्ञानेश्वर महाजन हा अतिशय हुशार विद्यार्थी होता. त्याचे वडील ज्ञानेश्वर धना महाजन हे करगाव (ता. चाळीसगाव) येथील आश्रमशाळा माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शुभम व त्याची बहीण श्रद्धा ही जुळी असून शुभम हा एकूलता एक मुलगा. शुभमचे माध्यमिक शिक्षण चाळीसगावच्या डॉ.पूर्णपाञे विद्यालयात झाले असून के.आर.कोतकर महाविद्यालयात त्याने 12 वी पर्यंत शिक्षण घेतले होते. 12 वी नंतर लोणेर (ता.माणगाव जि. रायगड) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी मध्ये केमिकल इंजिनिअरींगची पदवीही संपादन केली होती. तर शुभम याची बहीण श्रद्धा हीनेही कराड येथे बी टेक केले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून शुभम हा दीपस्तंभ स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करीत होता. यासोबतच भाजपाचे डॉ.उत्तमराव महाजन व ऊद्धवराव महाजन यांचा शुभम हा सख्खा पुतण्या आहे.
घटनास्थळावर चप्पल आणि बॅग मिळाली
शुभम याने तिसर्या मजल्यावर जावून स्वत:ला पेटवून घेत खाली उडी मारून आत्महत्या केल्यानंतर पोलिसांना गच्चीवर त्याची चप्पल आणि बाथरुममध्ये बॅग मिळून आली आहे. त्यानंतर शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तर शुभम हा बदामाच्या झाडावर अडकून खाली पडल्याने झाडाच्या फांद्या देखील तुटलेल्या दिसून आल्या. यातच शुभम हा गेल्या वर्षी येथे स्पर्धा परिक्षेच्या क्लासला होता असे पोलिसांना विद्यार्थ्यांनी सांगितले. या घटनेमुळे मात्र, सर्वत्र खळबळ उडाली.
बी.टेक नंतर स्पर्धा परिक्षेची तयारी
शुभम याचे बी.टेक र्पयत शिक्षण झाले असून त्याचे वडील चाळीसगाव तालुक्यात एका आश्रम शाळेत शिक्षक आहेत. गेल्या वर्षी त्याने दीपस्तंभ येथे स्पर्धा परिक्षेचा क्लास लावला होता. मात्र, क्लास सोडल्यानंतर तो अभ्यासिकेत येत होता. आज तो दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा केंद्रात आला. अभ्यासिकेत रिंडीगसाठी आल्यानंतर तिसर्या मजल्यावरील गच्चीवर जावून त्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेत गच्चीवरून खाली उडी मारली. शुभम खाली पडताच विद्यार्थ्यांनी लागलीच त्याच्यावर पाणी टाकून आग विझविली. त्यानंतर त्याला जिल्हा रूग्णालयात नेले असता सायंकाळी 4.45 वाजता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान सदर विद्यार्थी दोन वर्षांपूर्वी दीपस्तंभचा विद्यार्थी राहीला असून सद्यस्थितीत दीपस्तंभमध्ये प्रवेश नसल्याचे यजुर्वेंद्र महाजन यांनी सांगितले आहे.