जळगाव । येथील डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘स्वदेशी अपनाओ ’ चा संदेश देत स्वच्छ भारत पंधरवाड्याचा समारोप करण्यात आला. ‘स्वच्छ भारत पंधरवाडा’निमीत्त डॉ. उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयातील तृतीय वर्षातून 25 व द्वितीय वर्षातून 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
या उपक्रमांतर्गत लोकशाहीर अण्णभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमीत्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए.पी.चौधरी, प्रा. निलेश भालतडक, प्रा. योगेश सोनोने, प्रा. परीस यादव, डॉ. जी.एच.वासु, प्रा. कुशल ढाके, प्रा. मनिषा बारी,चारूशिला चौधरी, प्रा. मनिेष चव्हाण, प्रा. सी.ए.चौधरी, प्रा. राहुल राजपुत, प्रा. निलेश पाटील आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. ए.पी.चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.