नवापुर। शहरात स्वदेशी जागरण मंच अभियान राबविण्यात आले. शहरातील व्यापारांनी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील व्यापारी व ग्राहक यांना प्रत्यक्ष भेटुन स्वदेशी वस्तु विक्री करण्याचे आवहन करण्यात आले. तसेच सर्वांना पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी व्यापार्यांनी सांगितले की, आम्ही मागच्या वर्षांपासुन चायना वस्तु आणुन विक्री करत ऩाही आणि यावर्षी देखील आम्ही विक्रीसाठी चायना वस्तु आणल्या नाहीत व यापुढे ही आणणार नाही असे सांगितले.
ग्राहकांनी चिनी वस्तु खरेदी करणार नाही असे सांगितले. स्वदेश पंधरवाड्यात शाळा तसेच ग्रामीण भाग,नागरीक यांना भेटी देऊन स्वदेशी वस्तुचे महत्व पटवुन दिले. स्वदेशी वस्तुबद्दल प्रचार व प्रसार करण्यात आला. तसेच जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. चंद्रशेखर पाटील, अजय अग्रवाल, राजु गावीत,सागर पाटील,भुषण सांगळे,अनिल मोरे,संदिप ढोले,प्रतिक चौधरी,हितेश भोई आदि उपस्थित होते.