कात्रजः अॅड.स्वप्नील ढमढेरे यांना धनुर्विद्या क्रीडा प्रकारातील कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2016-17 या पुरस्काराने नुकतेच सन्मानीत केले आहे. त्याबद्दल त्यांचा कात्रज दूध परिवाराच्यावतीने आज मंगळवारी जाहीर सत्कार करणेत आला.
यावेळी संघाचे चेअरमन मा.विष्णूकाका हिंगे, व्हा.चेअरमन मा.वैशालीताई गोपालघरे, संचालक रामचंद्र ठोंबरे, बाळासाहेब ढमढेरे, संदीप जगदाळे, बाळसाहेब खिलारी, दिलीप थोपटे, रामदास दिवेकर, चंद्रकांत शेटे, केशरताई पवार, दौलत लोखंडे, लक्ष्मण तिटकारे, जीवन तांबे, कार्यक्षकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर व संघाचे कर्मचारी उपस्थित होते.
सत्कारास उत्तर देताना अॅँड स्वप्नील ढमढेरे म्हणाले, हा सत्कार माझ्या द्दष्टीने परिवाराने केलेला सन्मान आहे. यापुढे देखील आणखी चांगली कामगिरी करून आपल्या अपेक्षांची पूर्तता करीन असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कुमार मारणे यांनी केले तर आभार प्रदर्शन पांडूरंग कोंढाळकर यांनी केले.