स्वप्नील सावंत यांनी जिंकली अर्ध मॅरेथॉन स्पर्धा

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने व पुणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित महापौर चषक अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत पुरूष गटात स्वप्नील सावंत व महिला गटात स्वाती गाढवे यांनी पहिला क्रमांक पटकाविला. दोघांनाही प्रत्येकी 51 हजारांचे रोख बक्षीस देण्यात आले. ही स्पर्धा च-होली गांव – मोशी – चिखली – कुदळवाडी – स्पाईनरोड – संत ज्ञानेश्‍वर क्रिडा संकुल, इंद्रायणीनगर आदी मार्गावर घेण्यात आली. विविध वयोगटात झालेल्या स्पर्धेमध्ये विजेत्या स्पर्धकांना 4 लाख 49 हजार रुपयांची रोख बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

चर्‍होली ते इंद्रायणीनगर मार्ग
स्पर्धेचे उदघाटन महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, क्रिडा कला व सांस्कृतिक समितीचे सभापती लक्ष्मण सस्ते, शहरसुधारणा समिती सभापती सागर गवळी, नगरसदस्य राजेंद्र लांडगे, विलास मडीगेरी, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, प्रशासन अधिकारी राजेश जगताप, क्रिडा अधिकारी रज्जाक पानसरे आदी उपस्थित होते. स्पर्धेचा समारोप इंद्रायणीनगर येथील संत ज्ञानेश्‍वर क्रीडा संकुल येथे पार पडला. यावेळी विजेत्या स्पर्धकांना महापौर नितीन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते बक्षिस व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी महापौर चषक अर्ध मॅरेथॉन

निकाल असा
पुरुष खुला गट 21 कि.मी. : स्वप्नील सावंत, सेहेंदर सिंग, किशोर गव्हाणे. महिला खुला गट 10 कि.मी. : स्वाती गाढवे, मनिषा साळुंखे, विनया मालुसरे. 18 वर्षीय शालेय मुले 6 कि.मी. : विकास पुनिया, बाला किसन, अजय क्षीरसागर. मुली : पायल आमले, पायल भालेकर, अंकिता कोळपे. 16 वर्षीय शालेय मुले 4 कि.मी. : सौरभ अनिल, सौरभ रावत, मोनु लाठर. मुली : अनुष्का मोरे, आदिती जगताप, श्रावणी कोल्हे. 14 वर्षीय शालेय मुले 3 कि.मी. : जितेंद्र मोनु, अजय चंद्र, साहिल खान. मुली : सायली गांजाळे, सपना चौधरी, मनाली रतनोजी.