स्वप्ने दाखविणार्‍यांकडून लक्ष्मीदर्शनाचा झाला लाभ

0

बोदवड । तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली असून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेससह कार्यकर्ते दोन जिल्हा परिषदेच्या जागा असून नाडगांव मनूर बु. गटातून पाच उमेदवार रिंगणात होते. जिल्हा परिषदेच्या या गटात 26 हजार 89 मतदार होते. त्यापैकी स्त्री 8 हजार 234 तर 9 हजार 90 पुरुषांनी असा एकूण 17 हजार 324 मतदारांनी 66 टक्के मतदान केले.

जिल्हा परिषदेसाठी झाली बहुरंगी लढत
साळशिंगी – शेलवड गटात एकूण सहा उमेदवार रिंगणात होते. साळशिंगी शेलवड गटात एकूण 24 हजार 547 मतदारांपैकी 7 हजार 587 स्त्रीयांनी मतदान केले. तर 8 हजार 794 पुरुषांनी मतदानाचा हक्क बजाविला. एकूण 16 हजार 381 मतदारांनी मतदान केले असून 66.73 टक्के मतदान झाले आहे. नाडगाव गणात पंचायत समितीसाठी चार उमेदवार रिंगणात आहे. तर मनूर बु. गणात एकूण 6 उमेदवार रिंगणात आहेत. तर साळशिंगी गणात पाच उमेदवार रिंगणात आहे. शेलवड गणात चार उमेदवार रिंगणात आहे. जिल्हा परिषदेच्या दोन जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात आहे. जिल्हा परिषदेसाठी महेंद्र सपकाळे व सुरेंद्र पालवे यांनी विजयी होण्यासाठी अतोनात परिश्रम घेतले असल्याचे दिसून आले. तर साळशिंगी – शेलवड गटात शेतकरी कामगार पक्ष व भारिप बहुजन महासंघ आघाडीच्या उमेदवार राणे तर मनूर गणात संगिता विक्रम पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमाला फळ मिळते किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. साळशिंगी गणात पक्ष आघाडीचे गोपीचंद सुरवाडे तर शेलवड गणात मुकेश महाजन यांच्या मतदार संघात देखील सकारात्मक वातावरण पहायला मिळाले. दोन्ही जिल्हा परिषद गटात मतदारांना लक्ष्मी दर्शन झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून आपला निर्णय दिला असला तरी निकाल काय लागतो याकडे
सर्वांचेच लक्ष लागून आहे.