स्वबळाच्या राजकीय आट्यापाट्या

0

एकछत्री राज्य करण्याचे दिवस संपले की काय, म्हणून आघाडी, युतीच्या पर्याय पुढे करुन, समान कार्यक्रमाच्या नावाखाली सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी मित्रपक्ष एकत्र येतात खरे पण प्रत्येकाकडून जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो.  सर्वच आपआपली राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात करतात. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारचे फंडे वापरतात, मतदार राजाही मागचा पुढचा विचार न करता सर्रास या आश्‍वानांना बळी पडून. मला काय पडलीय त्याची म्हणून प्रत्येक जण दुर्लक्ष करतो व यामुळेच राज्यकर्त्यांना फावते. सत्तेची उलथा-पालथ करण्याची ताकद मतदानात आहे पण मतदान का केले पाहीजे, कोणाला केले पाहीजे, याचा खरा अर्थच मतदारांना समजु दिला जात नाही.

कोणत्याही निवडणूकीचे पडघम वाजू लागले की, राजकीय चर्चांना उधाण येते, बर्‍याच चाचपणीनंतर, आघाडी आणि युतीच्या चर्चा रंगू लागतात आणि जोपर्यंत ठाम भूमिका स्पष्ट केली जात नाही, तोपर्यंत राजकीय पक्षांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली असते. अशी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण केली आहे. आजकालची निवडणूक मतदारांना अमिष दाखविल्याशिवाय पुर्णच होवू शकत नाही. अनेक प्रकारच्या आश्‍वासनांची खैरात निवडणूकीदरम्यान निरनिराळ्या राजकीय पक्षांकडून होत असते. दिलेल्या आश्‍वासनांचा अंमल होतो की नाही, याचा पाठपुरावा कोणी करतेच तसे होतांना दिसत नाही. दिलेली आश्‍वासनं किती पाळली जातात, हा विषय वेगळा…! पण एक मात्र नक्की, सत्तेवर कोणीही येवो, मतदार राजा राहतो तो जागच्या जागीच.

एकछत्री राज्य करण्याचे दिवस संपले की काय, म्हणून आघाडी, युतीच्या पर्याय पुढे करुन, समान कार्यक्रमाच्या नावाखाली सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी मित्रपक्ष एकत्र येतात यादरम्यान प्रत्येकाकडून जास्तीत जास्त जागा मिळविण्यासाठी एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर केला जातो. सर्वच आपआपली राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात करतात. निवडणुकीच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी नाना प्रकारचे फंडे वापरतात, मतदारराजाही मागचा पुढचा विचार न करता सर्रास या आश्‍वानांना बळी पडून मला काय पडलीय त्याची म्हणून प्रत्येक जण दुर्लक्ष करतो व यामुळेच राज्यकर्त्यांना फावते. लोकशाहीत मतदानाला फार महत्व आहे. सत्तेची उलथा-पालथ करण्याची ताकद मतदारांत आहे पण मतदान का केले पाहीजे, कोणाला केले पाहिजे, याचा खरा अर्थच मतदारांना समजू दिला जात नाही. मतदानाच्या मानसिकतेतच बदल करुन टाकला आहे.

राजकारणात कोणताही पक्ष हा एकमेकांचा कायमचा समर्थक किंवा विरोधक नसतो हे जरी खरे असलेतरी ध्येय-धोरणांच्या बाबतीत परिपक्वता असलेल्या मोठ्या पक्षांनी तरी स्वबळावर सत्ता हस्तगत करायला हवी. युती होण्याने अगर तुटल्याने राजकीय समीकरणे बदलतात, मनाप्रमाणे न झाल्यास एकनिष्ठा, प्रामाणिकपणा यांना सरळसरळ हरताळ फासला जातो. मतदारराजाला युती आघाड्यांशी काही घेणे देणे नसते किंबहुना युत्या, आघाड्या मतदारांचा कौल घेवून केलेल्या नसतात. त्यामुळे त्यांना त्या होण्याचे अगर तुटण्याचे कोणतेही सोयरसुतक मतदारांना नसते. त्यांना अपेक्षित असते चांगल्या नागरी सुविधा, ज्या गोष्टीसाठी निवडून दिले त्या सार्थकी लागण्याची अपेक्षा. किमान निवडणुकीवेळी राजकीय पक्षांनी अजेंड्यावर घेतलेले विषयांची पूर्तता या गोष्टी सर्वसाधारण मतदारांना राज्यकर्त्यांकडून अपेक्षित असतात. ह्या गोष्टींची पुर्तता झाली तरी मतदारांची मतदानाची भावना प्रबळ होण्यास मदतच हाईल.

रोजगाराच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर लोक शहरी भागांकडे स्थलांतरीत होत असतात. यामुळे शहरी व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो. वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी, वाहतुकीची समस्या, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, पावसाळ्याच्या दिवसांत जीर्ण इमारतींमुळे दरवर्षी होणारी जिवीत हानी, पालिका प्रशासनाच्या अधिपत्याखालील शाळांचा खालावलेला दर्जा, पाणी चोरी, पाणी गळती, भ्रष्टाचार, भोंगळ कारभार, असे अनेक प्रश्‍न आव्हानात्मक स्वरुपात उभे आहे. यामुळे व्यवस्था अधिकाधिक कार्यक्षम बनविणे हे फार मोठे आव्हान आहे. या सर्व प्रश्‍नांची उकल युती करुन करा, आघाडी करुन करा किंवा स्वबळावर करा याच्याशी सर्व सामान्य मतदाराचे काही घेणे देणे आहे का? याचा विचार सुज्ञ नेतेमंडळी, राजकारण्यांनी करणे अपेक्षित आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यात, कुरघोड्यांचे राजकारण करण्यात, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात वेळ वाया न घालता तो विकासात्मक दृष्टीकोनावर, अपुर्णावस्थेत राहिलेल्या शासनाचे कोट्यवधी रुपये खर्ची पडलेल्या कामावर खर्ची होणे हितावह ठरेल. कोण योग्य आणि कोण अयोग्य हे मतपेटीतून जनता ठरवेलच त्यामुळे राजकीय पक्षांनी काळजी करण्याचे कारण नाही.

– सुषलर भालेराव
9860074600