स्वयंघोषित गुरु रामपालसह १३ जणांना जन्मठेप

0

नवी दिल्ली-देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेल्या स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने ११ ऑक्टोंबरला दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले होते. रामपालला जन्मठेपेची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. हिसार कोर्टाने रामपालसह १३ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चार महिला आणि एका मुलाच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने त्याला दोषी ठरवले आहे. सुनावणी दरम्यान न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

२००६ मध्ये रामपाल यांनी ‘सत्यार्थ प्रकाश’ या धार्मिक पुस्तकातील काही भागावर आक्षेप घेतला होता. यामुळे रामपाल आणि आर्य समाजाच्या लोकांमध्ये वाद निर्माण झाला होता. यावेळी लोकांनी रोहतकमधील रामपाल यांचा आश्रम बंद करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रामपाल यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर गोळीबारही केला होता. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला होता. तर १६० जण जखमी झाले होते. यानंतर न्यायालयाने रामपाल यांना ४३ वेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही रामपाल न्यायालयात हजेरी लावत नव्हते. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस रामपाल यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या रोहतक येथील आश्रमात पोहोचले होते. मात्र, याठिकाणी रामपाल यांचे १५ हजार समर्थक आधीच हजर होते. यावेळी त्यांनी पोलिसांवरच दगडफेक, गोळीबार, पेट्रोल बॉम्ब आणि अॅसिड बॉम्बचा हल्ला चढवला होता.