नवी दिल्ली-देशद्रोह आणि हत्येचा आरोप असलेले स्वयंघोषित गुरु रामपाल याला हिस्सार कोर्टाने दोन्ही गुन्ह्यात दोषी ठरवले आहे. मात्र अद्याप त्यांना काय शिक्षा होणार हे उघड झालेले नाही. हिस्सार कोर्टाच्या तीन किलोमीटर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला. सुनावणीच्या दरम्यान २० हजार समर्थक कोर्ट परिसर, तुरूंग, टाऊन पार्क आणि रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये येण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. समर्थकांनी हिसंक वळण घेऊ नये त्यासाठी प्रशासनाने आधीच सर्व उपाययोजना केली.